Sunday, November 16, 2025

Self- reliant: आत्मनिर्भर

 आत्मनिर्भर : Self- reliant

 

         वरील शब्द या कोरोना (Covid-19) काळात सर्वांच्या परिचयाचा झालेला शब्द. आत्मनिर्भर या शब्दाचा उच्चार होताच सर्वांना स्व:ची जाणिव व्हायला वेळ लागणार नाही. ( राजकीय वळण वगळता) 

         आत्मनिर्भर हा एक शब्द नसून वैचारीकता आहे.  शब्दाला समजुन घेतलं तर जगण्याचा सारं समजल्याचा भास होईल. अशक्य ते शक्य होण्यास वेळ लागणार नाही. फक्त शब्दाला समजून जगता आले म्हणजे झाले. 

 स्वतंत्र भारत निर्मिती नंतर भरकटलेल्या जनतेला, कामगारांना एकत्रित होऊन जगण्यासाठी व स्व:तच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वावलंबी व्हा ! असे आव्हाहन केले गेले होते. स्वावलंबी व्हा ! हा नारा कोणी दिला हे सर्वाना माहिती आहे. स्वावलंबी होणे याच शब्दाला समांतर शब्द म्हणजे आत्मनिर्भर.

       आत्मनिर्भर विषयक तसे खुप सारे ताजे व जीवंत उदाहरण आज समाजात नकळत घडतांना दिसतात. काही लक्षात राहतात तर काही सहज विसरले जातात. हा विषय सर्वांसाठी जितका जिव्हाळ्याचा, तितकाच प्रोत्साहन देणारा सुद्धाआहे. या विषयावर लिहायला ठरले होते, तशी घटनाही माझ्या समोर घडली होती. परंतु प्रत्यक्ष लेखणीत उतरायला थोडा उशीर झाला. आत्मनिर्भर पणे जगणे हे जितके गर्भ श्रीमंत लोकांना जमते. तितक्याच प्रखरपणे आत्मनिर्भरता रक्तारक्तात संचारले आहे ते म्हणजे हातावर जगणाऱ्या लोकांत. म्हणतात अंगावर आलं की माणूस मार्ग शोधतो आणि सुरू होते तडजोड. या तडजोडीचा शेवट म्हणजे यश. यश मिळाल्यावर जन्माला येते ते म्हणजे आत्मनिर्भरता. एकदा माणूस आत्मनिर्भर झाला की समजा तो कधीही, कुठेही हार मानणार नाही. कदाचीत याच कारणानं आत्मनिर्भर या शब्दाला इतकं महत्व प्राप्त झालं असावं. 

Tourist in Satpuda

 Tourist in satpuda: सातपुड्यातिल प्रेक्षणीय


अब आगे क्या ?......Whats Next?...




 


       जून, जूलै व ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण अल्प होते. कमी पावसामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी चांगलाच चिंतेत होता. निसर्गाला का कुठून माझ्या शेतकऱ्यांची किव आली. वरूणराजा मागील ८/१० दिवसांपासुन चांगलाच बरसत आहे. चांगल्या आणि दमदार पावसाने आता सर्वच सुखावले आहेत. जिकडे-तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती आहे. चांगल्या पावसामुळे सातपुडा पर्वत तर चांगलाच आनंदी झाला आहे. संततधार पावसामुळे डोंगरात जिकडे-तिकडे पाणी झऱ्यांच्या रूपाने वाहत आहे. बहरलेले हिरवागार डोंगर पावसातील धुक्यात अजूनच सुंदर दिसत आहे. रिमझिम पाऊस,पसरलेलं धुकं आणि थंडगार वातावरण पाहता Trip चा बेत आखायला कोणाला आवडणार नाही. 


           पावसाळ्यात सातपुड्यातील डोंगररांगा महाबळेश्वर पेक्षा कमी नाहीत असे वाटते. परंतु संततधार पाऊस व दिवसाही अंधारमय वातावरण त्यातल्यात्यात खराब रस्त्यांमुळे डोंगरातील प्रवास टाळलेलाच बरा असे वाटते. कारण पावसाळ्यात डोंगरात जास्त पाऊस असतो हे सर्वश्रुत आहे. परंतू या आल्हाददायक वातावणाचा आनंद घ्यायचा म्हटला तर प्रवासाला रस्ते चांगले असणे तितकेच महत्त्वाचे. महाबळेश्वरला डोंगर परिसर असून तेथे जास्त पाऊस असतो. अशा परिस्थितीतही तेथे पर्यटक जास्त का जात असतील? उत्तर आहे... प्रवासासाठी चांगले रस्ते हे तुम्ही समजू शकता…..


Tourist in Satpuda


        वरील फोटो पाहून प्रवासातील प्रवाशांचे हाल तुम्हाला उमजून येतील. 


मागील ८/१० दिवसांपासून पावसांने चांगलाच जम बसवलाय. थांबण्याचे नावं काही घेईना. मात्र या पावसात घरातील नेहमीची कामं थांबवून कसं चालणार….


दैनंदिन गरजा भागविण्यासाठी घरातून बाहेर यावेच लागते? त्यातल्यात्यात गरजा शहरांशी जोडलेल्या असतील तर... प्रवास करावाच लागेल. 


       वरील फोटो हा सातपुडा पर्वतातील होराफळी घाट सेक्शन मधील आहे. हा परिसर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील आहे. दमदार पावसाने घाट सेक्शन मधील रस्ता पुर्ण वाहून गेला आहे. रस्त्याची अवस्था फाटक्या कपड्यांसारखी झाली आहे. ज्याला ठिगळ लावावं तर कुठे? त्यातल्यात्यात दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शहराला येणे भाग पडत असल्याने प्रवासी मात्र चांगलाच अडचणीत आला आहे. 


         सातपुड्यातील रस्त्यांचं रडगाणे मात्र नेहमीचेच झाले आहे. आला पावसाळा की वाहला रस्ता. पण दूरूस्ती मात्र नाही. वारंवार सांगूनही दुरुस्ती जैसे थे. त्यामुळे परिसरातील लोकांनाही याची सवय झाली आहे. कारण अशी स्थिती आजच झाली तर सांगावे. दर वर्षी हेच हाल तर सांगावे कोणाला? जसे..



.चिमणीचं घरटं वाऱ्याने उडाले तर चिमणा-चिमणी कोणी मदत करेल याची वाट पाहत बसत नाही. तर हे माझं मलाच करावे लागेल म्हणून पुन्हा नवीन घरटे स्वतः बनवायला सुरुवात करतात. 

          या कथे प्रमाणे सातपुड्यातील आदिवासीही गरज मलाच आहे. हे समजून रस्त्याची दुरुस्ती स्वतः करतो आणि आपापल्या मार्गी लागतो. सातपुड्यास्थीत आदिवासींचा हा गुण वाखाणण्याजोगा आहे. या सातपुडा पर्वतात रहिवासी म्हणून राहणारा आदिवासी मागील कित्येक वर्षांपासून या परिसरात वास्तव्य करतोय. काही वयस्क व्यक्तींना भेटल्यावर त्यांचे अनुभव खुप काही सांगुन जातात. वर्षानुवर्षे दळणवळणाची स्थिती बदलेली नाही. वरील स्थिती पाहता शासन दरबारी दरवर्षी वेगवेगळ्या योजना व देयके मंजूर होत असतात परंतु ते लोकांपर्यंत पोहोचत नाही असे वाटते. अशाही परिस्थितीत येथील रहिवासी मात्र कुठे मोर्चा, रास्तारोको व इतर धुमाकूळ घातल्याचे ऐकिवात नाही. त्यांचे कारण म्हणजे आत्मनिर्भरता होय. येथील रहिवासीत आत्मनिर्भरता हा गुण ठासून भरलेला दिसून येतो. काहीही विपरीत घटना घडल्या तर सर्वप्रथम स्वतः ते मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतो. त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न पणाला लावतो. सर्व प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर कुठेतरी शासन दरबारी कळवले जाते. पण शासन कडून मदत मिळेल यावर ठाम विश्वास मात्र ठेवत नाही. कारण आज पर्यंतचे अनुभव. दरवर्षी पावसाळ्यात हेच हाल होतात आणि पुन्हा परिसरातील लोकं फावडे घेऊन रस्ता दुरूस्ती करतात. हे वर्षानुवर्षे चालत आलेलं सत्य. 


 


              आता आजच्या लेख ला दिलेल्या Heading कडे वळूया…


                 आपण खुप साऱ्या चित्रपटात हे वाक्य ऐकले असेल. अब आगे क्या?…. चित्रपटात तशा परिस्थितीत निर्माण केल्या जातात व तसे चित्रीत करुन पडद्यावर झळकवले जाते. आपणही तितक्याच खुबीने ते पाहतो व वाहव्वा करतो. परंतु अशा परिस्थिती जर प्रत्यक्षात घडल्या तर सामोरे जातांना आपली भंबेरी उडल्याशिवाय राहणार नाही. 


       वरील फोटोतील रस्ता जर तुमच्या नेहमीच्याच प्रवासातील असेल तर कितीही पाऊस व धुकं पडलं तरी तुम्हाला अब आगे क्या? हे माहिती असते. त्यामुळे तुम्ही न घाबरता प्रवास करतात. परंतु प्रवासी जर नवखा असेल तर? तुम्ही समजू शकता? खराब खड्ड्यांचा रस्ता, पुढील वळण कसं असेल हे माहिती नसेल आणि डोंगरातून वाहणाऱ्या सरी आपल्या सोबत मातीही वाहुन आणत असतील तर ते दृश्य किती भयावह असेल. अशावेळी डोंगर खचण्याची मोठी भिंती असते. अशात तुमच्या दैनंदिन गरजा प्रवासाशिवाय भागत नसतील, तो प्रवास तुमच्या कुटुंबासह करणे पर्याय नसेल तर….विचार करणं किती अवघड ???…...



      या परिसरात प्रेक्षणीय स्थळे खुप आहेत. जसे की उंचावरून कोसळणारा धबधबा, देवस्थान, घनदाट वृक्षांची जंगले, काही जंगली प्राणी, हिल स्टेशन, वळणावळणाची रस्ते आणि शांत व मीतभाषी तसेच जंगल जमीनीशी आजही नाते जोडलेला येथील रहिवासी. आजही येथे वास्तव्यास असलेला आदिवासी आपली परंपरा व जल,जंगल,जमीन हेच माझे दैवत मानत आलेला आहे. सातपुडाच्या पर्वत रांगेत पाहण्यासाठी खुप मजेदार ठिकाणे आहेत. परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या वनभाज्या तर खुप प्रसिद्ध आहेत. फक्त गरज आहे ती म्हणजे चांगले रस्ते, संदेशवहन ( mobile coverage) व काही पर्यटकांसाठी लागणाऱ्या सुविधा. 

   इतका देखणा परिसर असतांना फक्त काही अपुऱ्या सुविधेमुळे निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी मन तर तयार होते. परंतू अपुऱ्या सुविधा आणि कोसळणारा पाऊस आणि अंधारमय वातावरणात पडलेलं धुकं पाहता अब आगे क्या ….हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.


 


 


 



 

Educational tricks: Coverage Point

 Educational Tricks: Coverage Point 

 

   Coverage point  शैक्षणिक जुगाड.

   Coverage point Educational TRICK

 

      जग दिवसेंदिवस अफाट प्रगती करत आहे. प्रगतीसाठी जगात प्रत्येक घटकांने यश मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच मागील दोन वर्षापासून पूर्ण जगाला जीवघेण्या रोगाने मनुष्याला जगण्यासाठी हतबल केले आहे. कोरोना हा रोग जितका भयंकर आहे, तितकाच एक प्रकारे मार्गदर्शक ही आहे असं वाटते.  कारण या रोगाने मनुष्याला जगण्याच्या वेगवेगळ्या वाटा उपलब्ध करून दिल्या. खरच या जीवघेण्या रोगाने आपल्या जवळच्या माणसांचे महत्त्व पटवून दिले.

  शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया अस आपण म्हणतो. परंतु याच शिक्षणाला Lockdown च्या काळात जेल बंद व्हावं लागलं. परंतु Digital माध्यमाने दुसऱ्या मार्गाने का होईना पुन्हा दरवाजे उघडून दिले. Lockdown च्या काळात शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल झालेले दिसून आपल्या सर्वांना दिसून आले. त्यातला पहिला बदल म्हणजेच Digital शिक्षण. डिजिटल शिक्षण हे गोंडस नाव सर्वांच्या तोंडी काही क्षणात, काही दिवसात भरपूर Viral झालं. आणि आजही ते प्रत्येकाच्या तोंडी गुणगुणत आहे. नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे डिजिटल शिक्षणाला सुद्धा दोन्ही बाजू दिसून आले.ज्या ठिकाणी Coverage आहे तिथे हे आरामात विद्यार्थ्यांना मिळू लागले. परंतु ज्या परिसरामध्ये Mobile network, Mobile coverage उपलब्ध नाही तिथे मात्र Digital शिक्षण हे फक्त शब्दांपुरतं मर्यादित राहील.

  Digital शिक्षणाला खरे बळी पडले ते म्हणजे दुर्गम भागात काम करणारे शिक्षक आणि विद्यार्थी. अतिदुर्गम भाग,डोंगरदऱ्यांचा परिसर त्यात भर म्हणून  Mobile ला उपलब्ध न  झालेले Coverage. एका बाजूला शासनस्तरावरून होणारे वेगवेगळे प्रयोग, त्या प्रयोगाला अनुसरून येणारे परिपत्रके. शिक्षकांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग,विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण आणि….. असे एक ना एक दररोज काही ना काही नवनवीन मोबाईलच्या माध्यमातून पदरी पडणे चालूच आहे. 

  

Self- reliant: आत्मनिर्भर

  आत्मनिर्भर : Self- reliant             वरील शब्द या कोरोना   (Covid-19)  काळात सर्वांच्या परिचयाचा झालेला शब्द.  आत्मनिर्भर  या शब्दाचा उच...